Tuesday, May 2, 2017

!! ज्ञानरचनावाद !!


मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया अभ्यास करणे 
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रक्रिया घडवणे 
हसत खेळत शिकत शिकत बसतील वर्गात 
  माझी मुले होतील हुशार सांगू आम्ही गर्वात
क्रिया प्रक्रिया अंतरक्रिया होतील वर्गात
छोट्या छोट्या गोष्टीकडून जातील मोठ्या वर्गात
मनातील संवेदना शिक्षकांनी हेरुन
मुलांना घडवतील शिक्षक बोट धरुन
छोट्या छोट्या खेळातून चित्रातून
शिकतील ते जणू स्वतःच्या अनुभवातून
नको ते बंधन स्वतंत्र कृतीचा आनंद
सुप्तगुणांचे प्रगटीकरण
हेच तर जीवन घडवण्याचे साधन
शिक्षक - विद्यार्थी यांच्यातील संवाद
हाच आहे जणू ज्ञानरचनावाद !!


स्वरचित कविता 
श्रीमती. एम.व्ही.पगारे,उपशिक्षिका 
कै.ल.रा.काबरा प्राथमिक विद्याममंदिर,मालेगांव 

!! ज्ञानरचनावाद !! मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया अभ्यास करणे  शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रक्रिया घडवणे  हसत खेळत शि...